मी लिहितो ते समजून घेण्यासाठी
मला काहीतरी 'समजलं' आहे असं काही म्हणणं फार गमतीशीर आहे. 'बाजू घ्यावी लागणं' हे ठीकच. पण कायम, कोणत्याही परिस्थितीत एकाच बाजूला असणं माझ्यापुढे प्रश्न उभे करतं. 'मला अनेक शक्यता दिसतात, निश्चित भाष्य करणं शक्य नाही' किंवा सरळ 'मी गोंधळलेलो आहे' अशी माझी स्थिती बरेचदा होते आणि त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. हारुकी मुराकामी या प्रख्यात जपानी लेखकाचा 'आय राईट टू कॉम्प्रिहेंड' हा विचार मला म्हणूनच जवळचा वाटतो........